भाईंदरमध्ये ६१ मद्यपींवर कारवाई

मीरा-भाईंदर परिमंडळ १ आणि वाहतूक विभागाच्या पोलिसांनी थर्टी फर्स्ट व नववर्षाच्या पहाटे दरम्यान २९ ठिकाणी नाकाबंदी करत ६१ तळीरामांवर कारवाई केली.
भाईंदरमध्ये ६१ मद्यपींवर कारवाई
संग्रहित छायाचित्र
Published on

भाईंदर : मीरा-भाईंदर परिमंडळ १ आणि वाहतूक विभागाच्या पोलिसांनी थर्टी फर्स्ट व नववर्षाच्या पहाटे दरम्यान २९ ठिकाणी नाकाबंदी करत ६१ तळीरामांवर कारवाई केली. या तळीराम वाहनचालकांचे वाहनपरवाने रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.

मीरा-भाईंदर शहरात २९ ठिकाणी व प्रमुख नाके दहिसर चेक नाका, गोल्डन नेस्ट नाका, एस.के. स्टोन नाका, काशिमीरा नाका या ठिकाणी नाकाबंदी केली होती. वाहतूक शाखेमार्फत ४ पोलीस अधिकारी व ७४ पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. सन २०२४ या पूर्ण वर्षामध्ये एकूण २५५ ड्रंक ॲन्ड ड्राईव्हच्या केसेस केल्या आहेत, तर या एकाच आठवड्यात एकूण ८३ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत तर थर्टी फर्स्टच्या रात्री ५४ तळीरामांवर कारवाई केली असल्याची माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांनी दिली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३९७ बेशिस्त वाहनचालकांवर तर अमली पदार्थच्या ५ , दारूबंदी १ आणि १ ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in