भिवंडीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी खासदार रस्त्यावर, बेजबाबदार ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

भिवंडी शहर व ग्रामीण भागात वाहनचालकांसह प्रवाशांना भेडसावणारी वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासंदर्भात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी गुरुवारी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मुंबई-नाशिक महामार्गाचा पाहणी दौरा केला.
भिवंडीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी खासदार रस्त्यावर, बेजबाबदार ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
@mebalyamama/Instagram

भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागात वाहनचालकांसह प्रवाशांना भेडसावणारी वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासंदर्भात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी गुरुवारी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मुंबई-नाशिक महामार्गाचा पाहणी दौरा केला. यावेळी खारेगाव, हायवे दिवा, मानकोली, ओवळी, रांजनोली नाका ते वडपापर्यंतच्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. या महामार्गावर सुरू असलेल्या व अपूर्ण कामांची पाहणी करून विविध उपाययोजना खासदार म्हात्रे यांनी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुचविले असून भिवंडीतील वाहतूककोंडीवर पर्याय काढण्यासाठी वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या पाहणी दौऱ्यात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनीत राठोड, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता सुभाष बोरसे, रस्ता रुंदीकरण कामाचा ठेका घेतलेले ठेकेदार यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

भिवंडीत मागील आठ दिवसांपासून प्रचंड वाहतूककोंडी होत असून या वाहतूककोंडीत वाहनचालकांसह प्रवाशांना तीन ते चार तास अडकून रहावे लागत आहे. तसेच चाकरमान्यांसह शालेय विद्यार्थ्यांना देखील या वाहतूककोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या या समस्येची दखल भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे यांनी घेत गुरुवारी मुंबई-नाशिक महामार्गासह भिवंडी ठाणे महामार्ग व मानकोली, अंजुर फाटा, चिंचोटी महामार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी मानकोली येथील आर. के. बिल्डर्स कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत उपाययोजना सुचविण्यात आल्या.

logo
marathi.freepressjournal.in