२८ वर्षांनंतर सफाई कामगारांनी मिळले हक्काचे घर

सफाई कामगार भगवान बारिया यांनी व त्यांच्या सहकार्यांनी उपोषण ही केले होते.
२८ वर्षांनंतर सफाई कामगारांनी मिळले हक्काचे घर

गावदेवी येथे सफाई कामगारांची वसाहत होती. ती माळ्याच्या तीन इमारती होत्या. या इमारतीत सफाई कामगारांची ७२ कुटुंब राहात होती. इमारती धोकादायक झाल्याने १९९५ मध्ये महापलिकेकडून इमारती पाडण्यात आल्या व त्या बरोबर १८ महिन्यात पुन्हा याच ठिकाणी करणार व खोल्यांचे मालकी हक्क कामगारांना देणार, असे सफाई कामगारांना करारनामे करून देण्यात आले होते.

परंतु, अनेक वर्ष कामगारांचे पुनर्वसन झाले नव्हते. यामुळे सफाई कामगार भगवान बारिया यांनी व त्यांच्या सहकार्यांनी उपोषण ही केले होते. परंतु आश्वासना व्यतिरिक्त काही मिळाले नाही. याबाबत बारिया यांनी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांची भेट घेतली होती. केळकर यांनी तात्काळ या विषयाबाबत महापालिका अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला. ठामपा आयुक्तांशी वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर ३५ सफाई कामगार कुटुंबांच्या घरच्या लॉटरी काढण्यात आल्या. यावेळी सफाई कामगारांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते.

२८ वर्षांत कोणी केले नाही ते केवळ एक वर्षाच्या आता केळकर यांनी आमच्यासाठी केले, अशी भावना सफाई कामगारांनी बोलताना व्यक्त केली. यापूर्वीही केळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजनाच्या माध्यमातून ५६ सफाई कामगार कुटुंबांना व शेकडो बेघरांना कायमस्वरूपी घरे मिळवून दिली आहेत. यावेळी आमदार केळकर यांचे सर्व सफाई कामगारांनी आभार व्यक्त करून त्यांच्या बद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in