मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी नंतर कल्याणमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष

शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत, फटाके फोडत आपला आनंद साजरा केला.
 मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी नंतर कल्याणमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष
Published on

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वत्र कार्यकर्ते जल्लोष करत असून कल्याणमध्ये देखील शिवसैनिकांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उंबर्डे येथील कार्यालयासमोर एकच जल्लोष करण्यात आला.

यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत, फटाके फोडत आपला आनंद साजरा केला. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर हे देखील सुरूवातीपासून एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. आमदार विश्वनाथ भोईर यांचे भाऊ माजी नगरसेवक प्रभूनाथ भोईर यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला खूप अभिमान वाटतोय त्याचा आनंद साजरा करतोय, एकनाथ शिंदे आमदार बाहेर घेऊन गेले तेव्हापासून ते आम्ही शिवसेनेत आहोत असे सांगतायत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही याचा अर्थ ते शिवसेनेत आहेत. ते शिवसेना नेते आहेत ते एक शिवसैनिक म्हणून मुख्यमंत्री झाले त्याचा मला खूप आनंद वाटतो म्हणून आम्ही आनंद साजरा करतोय अशी प्रतिक्रिया दिली.

यावेळी माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर, जयवंत भोईर, परिवहन सदस्य सुनील खारूक, माजी नगरसेविका वैशाली भोईर, पुष्पा भोईर, रामदास कारभारी, युवा सेना विभाग अधिकारी वैभव भोईर, जयेश लोखंडे, जितू भंडारी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in