लेखी आश्वासनानंतर जिल्हा काँग्रेसचे आंदोलन स्थगित, पालिकेच्या प्रभाग कार्यालयावर ठिय्या आंदोलन यशस्वी!

प्रभागातील समस्या आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेसतर्फे मंगळवारी (दि. ६) पालिकेच्या आय प्रभाग समिती कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
लेखी आश्वासनानंतर जिल्हा काँग्रेसचे आंदोलन स्थगित, पालिकेच्या प्रभाग कार्यालयावर ठिय्या आंदोलन यशस्वी!

वसई : प्रभागातील समस्या आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेसतर्फे मंगळवारी (दि. ६) पालिकेच्या आय प्रभाग समिती कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे पालिका अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. वसई -विरार जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

आंदोलन सकाळी ११ वाजता सुरू झाले, ते थेट रात्री साडेदहा वाजता स्थगित करण्यात आले. पालिकेचे अभियंते ठाकरे व प्रकाश साटम यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. नंतर कार्यपूर्ती करण्याचे लेखी आश्वासन दिले. आगामी १० दिवसात कामांची पाहणी, पडताळणी व पूर्तता होण्याची शक्यता आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विजय पाटील दुपारपर्यंत या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी २५० पेक्षा जास्त काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आय प्रभाग कार्यालयात ठिय्या दिला होता. काही ठिकाणचे नवीन टेंडर निघालेले असून काही ठिकाणी नवीन कामांची टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास येणाऱ्या १० दिवसानंतर स्थगित ठेवलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल असा गंभीर इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

या आंदोलनात रॉईस फरेल, रामदास वाघमारे, महिला जिल्हाध्यक्षा प्रविना चौधरी, मिर्ची शेठ, विल्फ्रेड डिसूझा, कुंदन सुतार, रोहिणी कोचरेकर, छाया चोरघे, सलीम खिमाणी, निखिल उपाध्याय, विद्याधर मोरे, शैलेश तोडणकर, बिनाताई फुर्ट्याडो, बबन लोपीस, शिलू परेरा, राकेश गोंसालवीस, निलेश पगारे, कुंदन सुतार तसेच प्रकाश पाटील हे देखील उपस्थित होते. या आंदोलनासाठी रोयीस फेरेल आणि टीम यांनी विशेष मेहनत आणि पाठपुरावा केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in