भूतबाधेच्या नावाखाली अघोरी उपचार: जादूटोणाविरोधी कायदा लागू करा; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

भूतबाधेच्या नावाखाली अघोरी उपचार: जादूटोणाविरोधी कायदा लागू करा; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

पोलिसांनी सदर प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आ
Published on

कल्याण : ठाण्यातील सावरकर नगर येथे अघोरी पद्धतीने भूतबाधा उतरविणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याबाबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे शाखेच्या वतीने वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थानिक शाखा ठाणे, यांच्याकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सायली संतोष भोसले कार्यालय, वास्तू ओंकार विसावा सोसायटी, प्लॉट नंबर ७५, सी- ३, म्हाडा वसाहत, सावरकर नगर ठाणे, वरील पत्त्यावर कार्यालय चालवत आहेत. ही महिला तिच्या कार्यालयात जादूटोणा, अघोरी विद्या, भूत, करणी, मूठ असे प्रकार करत असल्याचे समितीने पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. या संदर्भात समितीकडे व्हिडीओसह तोंडी तक्रारी प्राप्त झाल्या.

हा प्रकार जादूटोणाविरोधी कायदा २०१३ (महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३)नुसार गून्हा आहे. तसेच चमत्कारिक पद्धतीने रोगमुक्तीचा दावा करणे ड्रग्स अँड मॅजिक रेमिडीज अक्ट १९५४ नुसार गुन्हा आहे. पोलिसांनी सदर प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in