अंबरनाथ, बदलापूरात नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर होणार

सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे महिन्याभरापूर्वी प्रभाग आरक्षण जाहीर झाले आहे
अंबरनाथ, बदलापूरात नगर परिषदेच्या  निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर होणार

अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी २८ जुलै ओबीसी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. या आरक्षण सोडतीनंतर अनेक प्रभागात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोणकोणत्या प्रभागांत ओबीसी आरक्षण पडणार याकडे इच्छुक उमेदवारांचे डोळे लागले आहेत.

अंबरनाथ व कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे महिन्याभरापूर्वी प्रभाग आरक्षण जाहीर झाले आहे. यावेळी ओबीसी आरक्षणाचा निर्णय प्रलंबित असल्याने फक्त अनुसूचित जाती-जमातींसाठी व महिलांसाठी राखीव असलेल्या जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. यापूर्वीच प्रभाग रचना अंतिम झाल्याने तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होईल,अशी शक्यता वर्तवली जात असल्याने इच्छुक उमेदवारांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुक लढवण्याचा तयारीने अनेक इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मान्यता दिल्यानंतर निवडणूक आयोगाने या नगर परिषदांमध्ये ओबीसींच्या जागा आरक्षित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in