ट्रेलरची पन्नासहून अधिक वाहनांना धडक

अंबरनाथमध्ये एका मद्यधुंद ट्रेलरचालकाने विरोधी दिशेने भरधाव ट्रेलर चालवत पोलिसांच्या गाडीसह ५० हून अधिक गाड्यांना धडक दिल्याची घटना अंबरनाथमध्ये समोर आली आहे.
ट्रेलरची पन्नासहून अधिक वाहनांना धडक
Published on

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका मद्यधुंद ट्रेलरचालकाने विरोधी दिशेने भरधाव ट्रेलर चालवत पोलिसांच्या गाडीसह ५० हून अधिक गाड्यांना धडक दिल्याची घटना अंबरनाथमध्ये समोर आली आहे. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मात्र नुकसान झाले आहे.

गुरुवारी अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीमधून जाणाऱ्या काटई-बदलापूर राज्य महामार्गावर भरधाव ट्रेलरचा थरार पाहायला मिळाला. डोंबिवलीकडून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रेलरने नेवाळी नाक्यावर एका वाहनाला धडक दिली. त्यानंतर पालेगाव, अंबरनाथ, आनंदनगर पोलीस चौकी, सुदामा हॉटेल चौक परिसरात चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने वाटेत समोर येईल त्या वाहनाला धडक दिली. यामध्ये कार, रिक्षा, दुचाकी गाड्यांसह पोलिसांच्या व्हॅनचे मोठ नुकसान झाले आहे. ट्रेलरचालकाच्या तावडीतून वाचण्यासाठी वाहनचालक सैरावैरा पळत होते. अखेर एमआयडीसी परिसरातील एनालटेक फार्मा कंपनी जवळ ट्रेलरचालकाने कंपनी बाहेर उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली आणि इथेच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी ट्रेलरचालकाला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in