Ambernath : तहसील कार्यालयाच्या पार्किंगमध्ये बांधले बैल; दुष्काळाच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

राज्यातील अनेक भागांसह ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यावरही दुष्काळाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर अंबरनाथ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी (शप)च्या पदाधिकाऱ्यांनी चक्क तहसीलदार कार्यालयाच्या पार्किंगमध्ये बैल बांधून अनोख्या पद्धतीने दुष्काळाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.
Ambernath : तहसील कार्यालयाच्या पार्किंगमध्ये बांधले बैल; दुष्काळाच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन
Ambernath : तहसील कार्यालयाच्या पार्किंगमध्ये बांधले बैल; दुष्काळाच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आंदोलनX|NCPspeaks
Published on: 

अंबरनाथ : राज्यातील अनेक भागांसह ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यावरही दुष्काळाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर अंबरनाथ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी (शप)च्या पदाधिकाऱ्यांनी चक्क तहसीलदार कार्यालयाच्या पार्किंगमध्ये बैल बांधून अनोख्या पद्धतीने दुष्काळाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.

सोमवारी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ तहसील कार्यालयाच्या आवारात हे आंदोलन करण्यात आले. हातात भाताची पेंढी घेऊन बैलगाडीवर बसून आलेले आंदोलक चर्चेचा विषय ठरले.

अंबरनाथ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, तहसीलदार दप्तरी शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावेत आणि भात शेतीचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावे, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे अविनाश देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी तहसीलदार अमित पुरी निवेदन घेण्यासाठी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी तहसील कार्यालयातील त्यांच्या वाहनाच्या पार्किंगच्या जागेत बैल बांधून त्यांना चारा खाऊ घातला.

तहसीलदार सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी उपलब्ध राहत नसल्याचा आरोप करीत आंदोलकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काशिनाथ पाटील, रमेश चव्हाण, कैलास शेंद्रे, अंकुश पाटील, राजेश वानखडे, प्रवीण चव्हाण आदी उपस्थित होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in