Ambernath Firing : पंढरीनाथ फडके यांना उल्हासनगर न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

या दोघांमध्ये गेल्या वर्षभरापासून बैलगाडी शर्यतीत हार-जीत यावरून सतत वाद होत आहेत. दोन्ही गटांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनेकदा आव्हान
Ambernath Firing :  पंढरीनाथ फडके यांना उल्हासनगर न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

अंबरनाथमध्ये रविवारी झालेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेले महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांना उल्हासनगर न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यासह अटक करण्यात आलेल्या एकनाथ फडके आणि हरिश्चंद्र फडके यांनाही आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याणमधील आडिवली गावातील राहुल पाटील यांच्यावर रविवारी अंबरनाथ शहरात अंदाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या. पनवेलचे पंढरीनाथ फडके आणि त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी फडके यांच्यासह एकूण 32 जणांवर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.

पंढरीनाथ फडके, एकनाथ फडके आणि हरिश्चंद्र फडके यांना रात्री उशिरा नवी मुंबईतून अटक करण्यात आली. या तिघांना आज उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 21 नोव्हेंबरपर्यंत आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेत केवळ आमच्या बाजूनेच नव्हे तर राहुल पाटील यांच्या बाजूनेही गोळीबार करण्यात आल्याचा आरोप पंढरीनाथ फडके यांनी केला आहे. मात्र पोलिसांनी राहुल पाटील यांच्या तक्रारीवरूनच त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पंढरीनाथ फडके, त्यांचे वकील अॅड. सत्यन पिल्ले यांच्यामार्फत न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने पोलिसांचे मत विचारले असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

Ambernath: बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंबरनाथमध्ये गोळीबार

या दोघांमध्ये गेल्या वर्षभरापासून बैलगाडी शर्यतीत हार-जीत यावरून सतत वाद होत आहेत. दोन्ही गटांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनेकदा आव्हान दिले. रविवारी अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ राहुल पाटील आणि पंढरीशेठ फडके आमनेसामने आले. यानंतर पंढरीनाथ फडके यांच्या समर्थकांनी राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in