रेल्वेच्या जागेत अनधिकृत पार्किंग करणाऱ्या रुग्णवाहिका जप्त

मात्र आता अचानक नियम व कायदे दाखवत अशा प्रकारची कारवाई होईल असे वाटत नव्हते. कायदा सर्वांना समान आहे, त्यामुळे
रेल्वेच्या जागेत अनधिकृत पार्किंग करणाऱ्या रुग्णवाहिका जप्त

डोंबिवलीतील रेल्वे प्रशासनाच्या जागेवर अनेक दिवसांपासून अनधिकृत पार्कींग करणाऱ्या रुग्णवाहिका रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई करत जप्त केल्या. बावनचाळीतील रेल्वेच्या जागेत रुग्णवाहिका पार्किंग केल्या होत्या. मंगळवारी सदर कारवाई करण्यात आली.
देवा रुग्णवाहिकेच्या पाच रुग्णवाहिका मंगळवारी रेल्वे सुरक्षा बलाकडून जप्त करण्यात आल्या. रेल्वे ऍक्ट सेक्शन १५९ नुसार ही कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले. तर देवा रुग्णवाहिकेचे भालचंद्र पवार यांना विचारले असता ते म्हणाले, देवा रुग्णवाहिका डोंबिवली पश्चिमेला पार्क केल्या जात होत्या. मात्र जागेअभावी रुग्णवाहिका बावनचाळीतील रेल्वेच्या जागेत पार्क करत होतो. २०२० ला कोरोना काळात रुग्णवाहिकेची गरज लक्षात घेता आम्ही सेवा दिली. त्यावेळी रेल्वे प्रशासनाला आपल्या जागेत रुग्णवाहिका पार्क होते हे माहीत होते. मात्र आता अचानक नियम व कायदे दाखवत अशा प्रकारची कारवाई होईल असे वाटत नव्हते. कायदा सर्वांना समान आहे, त्यामुळे आमच्याकडून नियमाचे उल्लंघन झाले असेल तर क्षमा असावी. परंतु रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई करण्याअगोदर कळविले असते रुग्णवाहिका दुसऱ्या ठिकाणी पार्क केली असती असे पवार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in