बोरघाटातील अपघातग्रस्त तरुणीचे अखेर निधन

चिरनेर येथील चिर्लेकर कुटुंब हे कार्ला येथील एकविरा आईचे दर्शन घेऊन घरी परतत असताना बोरघाटातील सायमाळजवळील तीव्र उतारावर रिक्षाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा साइड रोलिंगला धडकून भीषण अपघात झाला होता.
बोरघाटातील अपघातग्रस्त तरुणीचे अखेर निधन

उरण : कार्ले येथील एकविरा देवीचे दर्शन घेऊन परत येणाऱ्या चिरनेर येथील चिर्लेकर कुटुंबाच्या रिक्षाचा सोमवारी बोरघाटात भीषण अपघात झाला होता. या अपघातात चार जण जखमी झाले होते. या जखमींपैकी सायली देविदास चिर्लेकर या मुलीचे गुरुवारी उपचारादरम्यान निधन झाले.

चिरनेर येथील चिर्लेकर कुटुंब हे कार्ला येथील एकविरा आईचे दर्शन घेऊन घरी परतत असताना बोरघाटातील सायमाळजवळील तीव्र उतारावर रिक्षाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा साइड रोलिंगला धडकून भीषण अपघात झाला होता. या अपघातात साई चिर्लेकर, शकुंतला चिर्लेकर, मनीष चिर्लेकर आणि सायली चिर्लेकर या एकाच कुटुंबातील चार व्यक्ती जखमी झाल्या होत्या. जखमींवर खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

logo
marathi.freepressjournal.in