शिरगांवमध्ये सापडला लम्पी आजाराचा जनावर

मुरबाड तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे
 शिरगांवमध्ये सापडला लम्पी आजाराचा जनावर

मुरबाड तालुक्यात एक लम्पी आजाराचा जनावर सापडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने सर्तकतेचा इशारा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला आहे. परंतू मुरबाड तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुरबाड शहरात प्रमुख पशुवैद्यकीय दवाखाना असुन तेथे डॉ. श्रवण सिंग नियमित कार्यरत आहेत. जनावरे, पशु, प्राणी, यांच्यावर तात्काळ उपचार करतात. कोरोना काळात कुत्र्यांना कोरोनाची लस देउन त्यांचा जीव वाचवला होता. यावर्षी लम्पी आजाराचे सावट मुरबाडपर्यंत पसरले आहे. मुरबाड शिरगांव येथील एका जनावरावर उपचार करण्यात आले आहे. प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध नियंत्रण अधिनियमान्वये जनावरामध्ये लम्पी रोगाचा प्रार्दूभव आढळल्यास तशी माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना विभागास देणे बंधनकारक असताना, जनावरे खरेदी,विक्री वाहतुकीवर प्रतिबंधक असताना मुरबाडमध्ये जनावरे पशुप्राण्याची वाहतूक सुरू आहे. स्थानिक मुरबाड तालुक्यात खुटल, मोरोशी, न्याहाडी, शिरोशी, टोकावडा, धसर्इ, म्हसा, सरळगांव, उमरोली, मुरबाड, कोलठण, किशोर अशी १४ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र तेथील १० वैद्यकीय उपचार करणारे अधिकारी डॉक्टर नसल्याने शासनाच्या आदेशांना केराची टोपली मिळत आहे.

ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय मोठा आहे. दरआठवडयाला परराज्य परजिल्हयातून म्हशीची खरेदी वाहतूक होते. नगर, पुणे, आळेफाटा, नाशिक, संगमनेर, कल्याण, नवीमुंबर्इ अन्य बाजार पेठातून बकऱ्या, मेंढया, कोंबडयांची खरेदी वाहतूक प्रचंड प्रमाणात होते. गाय, बैल, म्हशी खेडेगांवात घरोघरी आहेत.मात्र त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर,औषध यंत्रणा नसल्यामुळे त्याचा फटका जनावरांना तसेच शेतकऱ्यांना बसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in