ठाण्यात मराठा समाजाचा रास्ता रोकोचा प्रयत्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले आणि त्याचा मोठा प्रश्न मार्गी लागला.
ठाण्यात मराठा समाजाचा रास्ता रोकोचा प्रयत्न

ठाणे : राज्य सरकारने १० टक्के मराठा आरक्षण दिले; मात्र कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेल्या परिपत्रकातील सगेसोयरे या शब्दाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यांच्या आदेशावरून राज्यभरात रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे; मात्र बारावीची परीक्षा असल्याने ठाण्यात प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन करण्यात येणार होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले आणि त्याचा मोठा प्रश्न मार्गी लागला. या निर्णयाचे ठाणेकरांनी स्वागत केले. त्याचवेळी ओबीसीमधून मराठ्यांना हक्काचे टिकणारे आरक्षण मिळावे, याकरिता मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात आंदोलन केली आहेत. आजही त्याचे उपोषण सुरू आहे. हे आंदोलन थांबविण्यासाठी राज्य सरकारने परिपत्रक काढले आणि कुणबी प्रमाणपत्र सापडले आहेत, त्यांच्या सगेसोयरे यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली; मात्र त्या परिपत्रकाची अंमलबजावणी राज्य सरकारने केली नाही. सहा लाख हरकती आल्याने त्यांचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे विधिमंडळात घेतली आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला आहे. त्यानुसार शनिवारी राज्यभरात रास्ता रोको करण्यात आले.

ठाण्यातील मराठा कार्यकर्त्यांनी वर्तकनगर, कॅटबरी चौक, यासह चार ठिकाणी आंदोलन केले. बारावीची परिक्षा लक्षात घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात घोषणाबाजी आणि परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली. रास्ता रोको करण्यापूर्वी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यास अटकाव करीत आंदोलनकर्त्यांना अटक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in