आता दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ठाणे; ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल, बॉम्ब शोधक पथक रवाना

आता दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ठाणे; ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल, बॉम्ब शोधक पथक रवाना

खबरदारी म्हणून पोलिसांकडून या ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

मुंबईनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यावर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी पडल्याचे दिसून येत आहे. ठाण्यातील सिनेगॉग चौकातील ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल ठाणे पोलिसांना आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक रवाना करण्यात आले. यानंतर परिसर रिकामा करुन शोध घेतला असता काहीही संशयास्पद आढळून आले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास आलेल्या मेलमध्ये मोठा घातपात होणार असल्याचा दावा करण्यात आला. ठाण्यातील सिनेगॉग चौक हा वर्दळीचा परिसर असल्याने पोलिसांनी सतर्कता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. यानंतर परिसर रिकामा करुन शोध सुरु करण्यात आला. मात्र, काहीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. खबरदारी म्हणून पोलिसांकडून या ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

RBIच्या कार्यालयासह 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी

दोन दिवसांपूर्वी आरबीआयच्या कार्यलयासह 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी ई-मेलवरून देण्यात आली होती. यात RBI च्या कार्यालयासह HDFC आणि ICICI बँकांचा देखील समावेश होता. या मेलमध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासह देशातील अनेक मंत्र्यांवर इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

याच बरोबर एक दिवसापूर्वी दिल्लीतील इस्राइली दुतावासाजवळ स्फोट झाल्याची घटना घडली होती. शिवाय दुताबासाबाहेर धमकीचे पत्रही सापडले होते.

दरम्यान, मुंबई पोलिसांना यावर्षी खोटी माहिती देणारे अनेक धमकीचे कॉल आणि ई-मेल आले आहेत. यापूर्वी देखील यापूर्वीही 15 ऑक्टोंबर रोजी एका व्यक्तीने ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. तर, 31ऑगस्ट रोजी मंत्रालय उडवून देणारा फोन आला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in