मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविका राबणार

राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालके व गरोदर महिलांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात. त्यांच्यावर निवडणुकीसंदर्भात जनजागृती करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या उत्सवामध्ये मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन मतदारांकडून मतदान करण्याचे संकल्पपत्र लिहून घेणार आहेत.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविका राबणार

ठाणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन संपर्क साधणार आहेत. शहरी व ग्रामीण क्षेत्रातील एकूण ४ हजार ५०० अंगणवाडी सेविका संकल्पपत्र घेऊन जनजागृती करणार आहेत. धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करेन अशा प्रकारचे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून आणि निवडणूक अधिकाऱ्याकडून मतदान वाढावे यासाठी विविध फंडे वापरले जात आहेत. भित्तीपत्रके, पोस्टर्स, ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती, चौकसभा, रॅली, मॉर्निंगवॉकसाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करण्याबरोबरच आता अंगणवाडी सेविकांद्वारे घरोघरी संपर्क साधला जाणार आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालके व गरोदर महिलांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात. त्यांच्यावर निवडणुकीसंदर्भात जनजागृती करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या उत्सवामध्ये मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन मतदारांकडून मतदान करण्याचे संकल्पपत्र लिहून घेणार आहेत.

असे आहे संकल्पपत्र

भारतीय घटनेने दिलेला मतदान करण्याच्या अमूल्य अधिकाराचा कोणत्याही परिस्थितीत वापर करेन. मतदान करून योग्य उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकार नसून ते माझे राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारी आहे. यासाठी मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना तसेच माझ्या परिचित व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहित करेन, असा संकल्प करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in