मिलापनगर तलावात ऑक्सिजनअभावी प्राणी मरणावस्थेत

जलप्राण्यांना तलावाच्या तळाशी देखील ऑक्सिजन मिळणे आवश्यक आहे
मिलापनगर तलावात ऑक्सिजनअभावी प्राणी मरणावस्थेत

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीमधील मिलापनगर तलावातील पाणी खराब/गढूळ झाल्याने मासे, कासव यांना ऑक्सिजन मिळत नसल्याने ते सकाळी सूर्यप्रकाशात सदर तळ्याच्या पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन ऑक्सिजन मिळण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जलप्राण्यांना तलावाच्या तळाशी देखील ऑक्सिजन मिळणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत खराब पाण्यामुळे जलप्राण्यांना ऑक्सिजन मिळणे कठीण होत असल्यामुळे जलप्राणी अधिक काळ जिवंत राहू शकत नसल्याची खंत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या तलावाच्या सुशोभीकरणसाठी आणि साफसफाईसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले असताना देखील या तलावाचे सौंदर्य भकास झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या तलावाचा सुशोभीकरणासाठी आणि साफसफाईसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. गेल्या महिन्यातच या तलावाची साफसफाई करण्यात आली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात तलावातील खराब पाणी बाहेर काढण्यात आले होते. परंतु तलावातील तळाचा गाळ काढण्यात आला नव्हता, या तलावाच्या मध्यभागी एखादी उंच सपाट जागा तयार करून ठेवली तर त्यावरील ऊन प्रकाशात कासवे येऊन बसतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in