आपट्याची पाने आदिवासींसाठी सोने

आदिवासी आदिवासी ही आपट्याची पाने दाट जंगलातून मुंबई, दादर, ठाणे, कल्याण,डोंबिवलीत येथे विक्रीसाठी आणतात
आपट्याची पाने आदिवासींसाठी सोने

दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. विविध प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री केली जाते. तसेच शस्त्रांची पूजा केली जाते. या सणाला आपट्यांच्या पानांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. सोने म्हणून आपट्यांच्या पानांना मान दिला जातो. हीच आपट्यांची पाने आदिवासी गोरगरिबांसाठी पोटाची खळगी भरण्याचे काम करत असता. दसऱ्याच्या सणामध्ये मोठ्या प्रमाणात आपट्यांची पाने विकली जातात.

आदिवासी आदिवासी ही आपट्याची पाने दाट जंगलातून मुंबई, दादर, ठाणे, कल्याण,डोंबिवलीत येथे विक्रीसाठी आणतात. वर्षातून एकदा का होईना,आपट्याची पाने आदिवासींच्या पोटाची खळगी भरत असल्याने शहापुरच्या गरीब आदिवासींसाठी ही पाने वरदान ठरली आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, वासिंद, खर्डी, कसारा, डोळखांब, किन्हवली, टाकिपठार, दहागाव, माहुली, पिवळी कातवाब,अघई, तानसा, टहारपूर, या डोंगर दऱ्या खोऱ्यात वास्तव्य करणारे आदिवासी दरवर्षी विजयादशमीला आपट्याची म्हणजेच शिदाची पाने विक्रीचा व्यवसाय करतात. दाट जंगलातून मेहनतीने खुडून आणलेली ही पाने गोळा करून डोक्यावर त्यांच्या जुड्या वाहिल्या जातात. दसऱ्याच्या एक-दोन दिवस अगोदर ही पाने बाजारात

विकायला आणतात. प्रचंड मागणी असलेल्या आपट्यांच्या पानांच्या जुड्या बांधून त्याची ५ ते १० रुपयांपर्यंत ग्राहकांना विक्री केली जाते. आपट्यांच्या पानांसोबत तोरण बनविण्यासाठी झेंडूची फुले,भातांची लोंब आंब्याची पाने,आदिवासी विक्रीसाठी आणतात. दसऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या आपट्याची पाने गरीब आदिवासींना रोजीरोटी मिळवून देत असल्याने दसरा सणातील ही आपट्याची पाने खऱ्या अर्थाने आदिवासींसाठी सोने ठरली आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in