
उल्हासनगर : शाळेत जाणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या आणि त्यांचा पाठलाग करणाऱ्या तरुणाला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेला आरोपी आधीच एका गंभीर गुन्ह्यातून नुकताच बाहेर आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर ४ परिसरात शुक्रवारी तीन विद्यार्थिनी शाळेत जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होत्या. त्याचवेळी, सुमित पाटील नावाचा एक तरुण लपून छपून त्यांची छायाचित्रे मोबाइलमध्ये काढत होता.