भिवंडी : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इन्स्टाग्रामवर प्रक्षोभक व्हिडीओ टाकणाऱ्याला अटक

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रक्षोभक व्हिडीओ तयार करून इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमावर प्रसारित करणाऱ्या तरुणाविरोधात...
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

भिवंडी : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रक्षोभक व्हिडीओ तयार करून इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमावर प्रसारित करणाऱ्या तरुणाविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

आलम फिरोज अन्सारी (२१) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलमने २८ फेब्रुवारी रोजी रात्री mr.alamhusain01 या इन्स्टाग्राम आयडीवरून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रक्षोभकपणे व्हिडीओ तयार करून इन्स्टाग्रामवर व्हायरल केली होता. सदर व्हिडीओ कामतघर परिसरात राहणाऱ्या अजिंक्य सूर्यकांत पवार या तरुणाने त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर बघितला. या पोस्टमुळे अजिंक्य आणि मराठा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने अजिंक्यच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in