ठाणेकरांना पाणीकपातीचे नो-टेन्शन

ठाणे शहराला महापालिकेच्या माध्यमातून ५८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत आहे. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.
   ठाणेकरांना पाणीकपातीचे नो-टेन्शन

ठाणे : ठाणे व मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे; मात्र तुर्तास तरी ठाणेकरांना पाणी कपात लागू करणार नसल्याचा दिलासा ठाणे महानगरपालिकेने दिला आहे. पाणीकपात करण्यासंदर्भातील कोणतेही आदेश तुर्तास न आल्याने ठाणेकरांना पाणीकपातीचे नो-टेन्शन आहे.

ठाणे शहराला महापालिकेच्या माध्यमातून ५८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत आहे. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्वच स्त्रोत शहरातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मानले जातात. यापैकी ठाणे महापालिका स्वत:च्या योजनेसाठी भातसा धरणातून पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा करते. भातसा धरणातून ठाणे शहराला एकूण ३३५ दशलक्षलीटर इतका पाणीपुरवठा रोज होतो.

दोन महिने पुरेल एवढा पाणीसाठा

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा धरणात पाणीसाठा कमी आहे. दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी पाणीकपात लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले, तरी संबंधित प्राधिकरणाने अद्याप तरी पाणीकपातीबाबत कोणतेही आदेश पालिकांना दिलेले नाहीत. त्यामुळे तुर्तास पाणीकपात करण्यात आलेली नाही. ठाणे महापालिकेने देखील अद्याप पाणीकपात लागू केली नसल्याचे सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in