विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आश्रम शाळा आल्या सीसीटीव्हीच्या नजरेखाली

शालेय विद्यार्थी व परिसरातील सर्व हालचालींवर यामुळे बरीक लक्ष ठेवता येणार असून अनुचित प्रकाराला आळा घातला जाऊ शकतो
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आश्रम शाळा आल्या सीसीटीव्हीच्या नजरेखाली

एकात्मिक वनवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत,आतापर्यंत वनवासींंच्या विकासाकरिता हजारो कोटी रुपये खर्च करून योजना राबविल्या जातात, पण एवढा खर्च झाला असला तरी पाहिजे तेवढा विकास वनवासींचा झालेला पहायला मिळत नाही. शिवाय शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा ही बाब नेहमीच अडचणीचा विषय राहिला आहे,मात्र आता आश्रम शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून निवासी आश्रम शाळा सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याच्या नजरेखाली आल्या आहेत.

शालेय विद्यार्थी व परिसरातील सर्व हालचालींवर यामुळे बरीक लक्ष ठेवता येणार असून अनुचित प्रकाराला आळा घातला जाऊ शकतो. एकात्मिक वनवासी विकास जव्हार प्रकल्पाअंतर्गत मोखाडा, विक्रमगड आणि वाडा असा चार तालुक्यांचा समावेश होतो. वनवासी विकास प्रकल्पामार्फत वनवासी मुलांसाठी एकूण ३० निवासी आश्रम शाळा आहेत.

जवळपास एकूण १५ हजारांच्या आसपास वनवासी निवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या निवासी आश्रम शाळेत शिक्षण

घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर काही घटना घडल्या आहेत. वनवासी विद्यार्थ्यांना नेहेमीच भासत असणाऱ्या उणीवा म्हणजे निवासी आश्रम शाळांची व शौचालयाची दुरावस्था, गळक्या व मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या, शिक्षकांचे दुर्लक्ष, असे अनेक प्रश्न आहेत. या आश्रम शाळांचे मुद्दे नेहमीच अधिवेशनात गाजलेले आहेत. आश्रम शाळेच्या परिसरावर लक्ष राहावे म्हणून अधिकाऱ्यांनी शक्कल लढवून सर्व आश्रम शाळा सीसीटीव्हीच्या नजरेखाली आणल्या आहेत.

शासकीय आश्रम शाळांच्या निवासी वसतिगृह परिसरात विद्यार्थ्याला विद्युतचा शॉक लागून मृत्यू ओढावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा अनेक घटना आश्रम शाळेत तसेच तेथील परिसरात घडत असतात मात्र याबाबत माहिती कोणालाच नसते त्यामुळे या परिसरात घडणाऱ्या घटनांवर लक्ष राहील यामुळे सीसीटीव्ही बसवल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. तसेच या सीसीटीव्हीमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, तासानुसार विद्यार्थ्यांचे अध्यापन होते की नाही, यासाठी सीसीटीव्हीचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे पालकवर्ग सांगत असून वनवासीविकास प्रकल्पाचे कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in