प्र.सहाय्यक आयुक्तांसह दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिन्ही लाचखोरांना अटक केली आहे.
प्र.सहाय्यक आयुक्तांसह दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

भिवंडी : नवीन मालमत्तेवर कर लावण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेताना भिवंडी करमूल्यांकन विभागाच्या प्र. सहाय्यक आयुक्तांसह महिला अधीक्षक आणि लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई पथकाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास महापालिकेच्या सहाव्या मजल्यावर दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पडकल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिन्ही लाचखोरांना अटक केली आहे. प्रभारी सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव (५४) अधीक्षक सायराबानो अन्सारी (५२) आणि लिपिक किशोर केणे ( ५१) असे लाच लुचपत विभागाने रंगेहाथ अटक केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. भिवंडी शहरातील एका जुन्या मालमत्ता धारकास मालमत्तेवर नवीन कर लावण्यासाठी लाचखोर अधिकारी सुदाम जाधव यांनी २ लाख ७ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडअंती दीड लाख रुपयांची लाच देण्याचे ठरले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in