सहाय्यक जिल्‍हा निबंधकाला लाच स्‍वीकारताना पकडले

 सहाय्यक जिल्‍हा निबंधकाला लाच स्‍वीकारताना पकडले
Published on

एमआयडीसीतील जागेच्‍या कामासंदर्भात फाईलच्‍या एज्‍युडीकेशन करण्‍यासाठी ३० हजारांची लाच स्‍वीकारताना रायगडचे सहाय्यक जिल्‍हा निबंधक तथा मुद्रांक जिल्‍हाधिकारी शैलेंद्र साटम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या पथकाने रंगेहात पकडले. सोमवारी रात्री झालेल्‍या या कारवाईमुळे जिल्‍हा निबंधक कार्यालयातील खाउगिरी समोर आली आहे.

तक्रारदार यांच्याकडून नव्याने सबमिट केलेली अॅग्रिमेंट फॉर जॉब वर्कची एक फाईलच्या पूर्तीकरिता आरोपी लोकसेवक यांनी पाच लाख रुपये व पूर्वी जमा केलेल्या तीन फाईल पैकी दोन फाईल व एक पेंडिंग फाईल अशा तीन एज्युकेशनच्या फाईलकरिता प्रत्येकी दहा हजार प्रमाणे तीन फाईलचे तीस हजार रुपये असे चार फाईल मिळून पाच लाख तीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यासदंर्भात नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्‍यात आली होती. त्‍यानुसार रात्री साटम यांच्या कार्यालयात सापळा रचून त्‍यांना लाच स्‍वीकारतांना रंगेहात पकडण्‍यात आले. यावेळी पथकाने कार्यालयाची झडती घेतली असता साटम यांच्‍या टेबलामध्ये ५ लाख ६३ हजारांची रोकड सापडली. ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले,अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in