आ. गायकवाड यांच्यावर ॲॅट्रॉसिटी दाखल

आ. गायकवाड यांच्यावर ॲॅट्रॉसिटी दाखल

द्वारली गावातील जागेच्या वादातून महिलांना जातीवाचक शब्दोच्चार केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात ॲॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर : द्वारली गावातील जागेच्या वादातून महिलांना जातीवाचक शब्दोच्चार केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात ॲॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गायकवाड यांच्यावर ज्या पोलीस ठाण्यात गोळीबार करण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच पोलीस ठाण्यात हा ॲॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाल्याने गायकवाड यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.

फिर्यादी महिला ही द्वारली गावात राहत असून तिचे पती रिक्षाचालक आहेत. महिलेचे स्वर्गीय सासरे नामदेव जाधव यांच्या नावावर सर्व्हे नंबर-६ची जमीन आहे. ३१ जानेवारी रोजी फिर्यादी महिला त्यांच्या जावेसोबत या जमिनीच्या ठिकाणी गेल्या असता, त्याठिकाणी साथीदारांसह आलेल्या आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली, असे या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारिख, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, मंगेश बारघेट यांच्यावर ॲॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप करत आहेत.

गोळीबाराच्या वेळी म्हणजेच २ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास याबाबतची तक्रार देण्यासाठी ही महिला गणपत गायकवाड यांची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती. तिची फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, गायकवाड यांनी पोलिसांसमक्ष शिवसेना शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर ही महिला पोलीस ठाण्यातून घाबरून पळून गेली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in