मोखाड्यात मायलेकींवर हल्ला

मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने मागील बाजूच्या खिडकीतून घरात प्रवेश केला
मोखाड्यात मायलेकींवर हल्ला

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील मौजे बादलपाडा येथील आई यशोदा पांडुरंग झुगरे (४८) व मुलगी गुलाब पांडुरंग झुगरे (२४) या दोघी घरात झोपलेल्या असताना अज्ञात हल्लेखोराने मागच्या बाजूने खिडकीतून प्रवेश करत त्यांच्यावर टोकदार शस्त्राने हल्ला करून पळ काढला. याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने मागील बाजूच्या खिडकीतून घरात प्रवेश केला असता हॉलमध्ये झोपलेल्या मायलेकी खिडकीच्या आवाजाने उठल्या आणि त्यांनी ओरड केल्याने अज्ञात इसमाने मिळेल त्या हत्याराच्या सहाय्याने यशोदा यांच्या पाठीवर वार केला. तेव्हा गुलाब आईला सोडवायला गेली असता तिलाही या अज्ञात इसमाने वार करून जखमी केले. या दोघींवर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले आहेत. याबाबत मोखाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला अज्ञात इसमावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in