ठाण्यात तरुणीवर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

कासारवडवली पोलीस ठाण्यात याबाबत तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यापैकी अजून एकालाही अटक झाली नाही.
ठाण्यात तरुणीवर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मुंबई : घोडबंदर रोडवरील ओवळा भागात सोमवारी मध्यरात्री अश्‍वजीत गायकवाड (३४) या तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने प्रिया सिंह या प्रेयसीला रेंज रोव्हर गाडीखाली चिरडले. यात प्रिया सिंह जबर जखमी झाली असून तिच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियाने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडल्यावर ही घटना उघड झाली.

अश्वजीत व प्रियामध्ये गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. घोडबंदर येथे राहणाऱ्या प्रिया सिंह हिला सोमवारी पहाटे ४.३० च्या सुमारास तिचा प्रियकर अश्वजीत गायकवाड याने ओवळा येथील कोटियाड हॉटेलजवळ भेटायला बोलावले. तेथे त्यांच्या ठिकाणी त्यांच्यात काही वाद झाले. आरोपी अश्वजीतने आपल्या प्रेयसीला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तसेच तिच्या डाव्या हाताला चावा घेतला.

दरम्यान, यावेळी आरोपीचा मित्र रोमील पाटील आणि सागर शेळके यांनी रेंज रोव्हर गाडी तिच्या अंगावर घातली. यात प्रियाच्या पायाला दुखापत झाली असून शरीरावर जखमा झाल्या आहेत. कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मोकाट आहेत. कासारवडवली पोलीस ठाण्यात याबाबत तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यापैकी अजून एकालाही अटक झाली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in