उल्हासनगरात तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; पूर्ववैमनस्यातून केला जीवघेणा हल्ला

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आयाजला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
उल्हासनगरात तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; पूर्ववैमनस्यातून केला जीवघेणा हल्ला

उल्हासनगर : पूर्वी झालेल्या फटाके फोडण्याच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा झाल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून जखमी तरुणावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आयाज मोहम्मद खान अस गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आयाज आणि त्याचा मित्र रवी उर्फ पंकज मोरे यांच्यात दिवाळीत फटाके फोडण्यावरून वाद निर्माण झाला होता. याच गोष्टीचा काटा काढण्यासाठी पंकजने ३१ डिसेंबरच्या रात्री उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकूने आयाज याच्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आयाजला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार दाखल केले आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी पंकज मोरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in