टपली मारली... जाब विचारला... संतापलेल्या दोघांचा रिक्षाचालकांवर चाकूने हल्ला

रिक्षाचालकाच्या तक्रारीवरून दोघा हल्लेखोरांवर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
टपली मारली... जाब विचारला... संतापलेल्या दोघांचा रिक्षाचालकांवर चाकूने हल्ला

२ इसमांनी एका रिक्षाचालकला मारहाण करून चाकूने हल्ला करून जखमी केले. ही घटना बुधवारी १९ तारखेला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात घडली. या प्रकरणी रिक्षाचालकाच्या तक्रारीवरून दोघा हल्लेखोरांवर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिताराम शेवाळे असे हल्ल्यात जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन जवळील इंदिरा चौकात सकाळच्या सव्वा सातच्या सुमारास २ अज्ञात इसमांनी रिक्षाचालक शेवाळे यांच्या डोक्यावर टपली मारली. टपली मारण्याच्या जाब विचारण्यावरून रिक्षाचालक शेवाळे यांच्यावर २ अज्ञात इसमांनी धारधार चाकूने हल्ला चढवला. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला असला, तरी ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. जखमी रिक्षा चालक शेवाळेंना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरून हल्लेखोरांवर रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३२६ आणि ३४ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. रामनगर पोलीस सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे तपास करत आहे. सहाय्याने त्या दोन आरोपीचा शोध रामनगर पोलीस सुरु केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in