पोलिसांची थकीत वीजबिल फसवणुकी विरोधात जनजागृती

ऑनलाईन पेमेंटसाठी अनेक अॅप उपलब्ध असून नागरीक त्यांचा वापर करत असतात
 पोलिसांची थकीत वीजबिल फसवणुकी विरोधात जनजागृती
Published on

तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत लोकांच्या फसवणुकीसाठी अनेक सराईत ऑनलाईन भामटे विविध हातखंडे अवलंबत आहेत. त्यातच आता वीज बिल भरले नसल्याने वीज कापण्याचे इशारे देऊन लोकांची ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार वाढल्याने मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांनी आवाहन करतांना म्हटले आहे की, ऑनलाईन पेमेंटसाठी अनेक अॅप उपलब्ध असून नागरीक त्यांचा वापर करत असतात. विविध बिलांची रक्कम ऑनलाईन पध्दतीने करण्याची सुविधा ग्राहकांना मिळण्यासाठी विविध कंपन्याचे अॅप सुरक्षित मानले जातात. परंतु या गोष्टीचा फायदा घेवून काही अपप्रवृत्तीचे लोक ऑनलाईन पध्दतीने नागरीकांची फसवणूक करीत असल्याबाबत तक्रारी महावितरण आदी वीज कंपनी पुरवठा कार्यालयाकडे वाढत आहेत. आपल्या महावितरण वा खाजगी टाटा,अदानी आदींच्या वीज बिलावर जो नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आहे त्यावर किंवा व्हॉट्सएप वर संदेश येत आहेत. ग्राहकाने चालू महिन्याचे वीज बिल भरलेले असताना सुध्दा, 'तुमचे लाईट बिल त्वरीत भरा अन्यथा तुमचे वुज कनेक्शन कट करणार व एक मोबाईल क्रमांक देऊन संबंधित अधिकाऱ्यास कॉल करा असे संदेश पाठवले जात आहेत.

अशा प्रकारचे संदेश मोबाईल वा व्हॉट्सॅपवर आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये तसेच त्यात दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू नये. अनोळखी लिंक प्राप्त असल्यास त्या लिंकवर क्लिक करु नये.

logo
marathi.freepressjournal.in