मुरुड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत असणाऱ्या रस्त्यांची बिकट स्थिती

विहूर येथील छोट्या पुलाजवळ प्रवास करणे फार जिकरीचे झाले होते.
मुरुड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत असणाऱ्या रस्त्यांची बिकट स्थिती
Published on

मुरुड तालुक्यात आतापर्यंत १२३७ मिलिमीटर पाऊस पडल्याने मुरुड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत असणाऱ्या रस्त्यांची दैना उडाली आहे. पावसाचे प्रमाण कमी असताना सुद्धा काही ठिकाणी खड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

विहूर येथील छोट्या पुलाजवळ प्रवास करणे फार जिकरीचे झाले होते. रस्त्याला खड्डे पडल्यामुळे दुचाकी वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. उजव्या बाजूस मोठाले खड्डे तर डाव्या बाजूला खड्डे त्यामुळे एखादे मोठे वाहन आल्यावर वाहन चालकांची मोठी पंचाईत होऊन दुचाकी वाहनांची छोटे मोठे अपघात होत होते.

पुलाच्या उजव्याबाजूकडील मोठ-मोठे खड्डे जेसीबीच्या सहाय्याने बुजवून त्यावर तीन नंबरची खडी अंथरण्यात येऊन रेंजगा अंथरण्यात येऊन हे मोठ-मोठे खड्डे बुजविण्यात आले आहेत. सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्पुरता दिलासा प्रवासी वर्गाला दिला आहे. याकडे बांधकाम खात्याने लक्ष देऊन संबंधित ठेकेदारास लवकरात लवकर काम सुरु होण्यासाठी प्रयत्नशील रहावे, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in