बदलापूर : सासऱ्यानेच केली जावयाची हत्या, पोलीस तपासात निष्पन्न

काही दिवसांपूर्वी बदलापूर-मुरबाड रस्त्यावर मृतावस्थेत आढळलेल्या योगेश केणे या ३८ वर्षीय इसमाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बदलापूर : सासऱ्यानेच केली जावयाची हत्या, पोलीस तपासात निष्पन्न

बदलापूर : काही दिवसांपूर्वी बदलापूर-मुरबाड रस्त्यावर मृतावस्थेत आढळलेल्या योगेश केणे या ३८ वर्षीय इसमाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दारू पिऊन शिवीगाळ करीत पेंढ्याला आग लावण्याची धमकी दिल्याने संतापलेल्या सासऱ्याने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

बदलापूर-मुरबाड रस्त्यावरील मोऱ्याचा पाडा या गावात बारवी नदीवरील पुलाखाली, १ मार्च रोजी दगडावर योगेश केणे (३८) याचा मृतदेह आढळून आला होता. कुळगांव पोलीस ठाण्यात याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या तपासात योगेश केणे (३८) याचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर सासऱ्याने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचेही पुढे आले. योगेश केणे हा २९ फेब्रुवारीला दारू पिऊन घरी आला आणि सासरा संतोष नाईक यास शिवीगाळ करून तुमच्या पेंढ्याला आग लावतो, असे सांगून घराच्या आजूबाजूला फिरत होता. याचा राग सासऱ्याला आल्याने तो योगेशला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावला, मात्र त्यावेळी योगेश पळून गेला.

रात्रीच्या सुमारास योगेश हा दारू पिऊन घरी येत असताना संतोषने पाहिले आणि घरी येताच त्यास मारहाण केली. तेव्हा संतोषने प्लास्टिक पिशवीमध्ये भरून त्या पिशवीचे तोंड बांधले आणि ती पिशवी मोटारसायकलवर दोरीने बांधून मोटार ७ ते ८ किलोमीटर अंतरावर बारवी नदीच्या पात्रातील दगडावर फेकून दिली. यामध्ये योगेशच्या डोक्याला, कानाला व इतर ठिकाणी गंभीर मार लागून त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी संतोष नाईक याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in