Badlapur : प्राजक्ता मेहेर यांची हत्या केल्याचे स्पष्ट; फॉरेन्सिक अहवालातून हत्येचा उलगडा

बदलापूरमधील प्राजक्ता मेहेर यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार फॉरेन्सिक अहवालातून समोर आला आहे.
Badlapur : प्राजक्ता मेहेर यांची हत्या केल्याचे स्पष्ट; फॉरेन्सिक अहवालातून हत्येचा उलगडा
Badlapur : प्राजक्ता मेहेर यांची हत्या केल्याचे स्पष्ट; फॉरेन्सिक अहवालातून हत्येचा उलगडा
Published on

बदलापूर : बदलापूरमधील प्राजक्ता मेहेर यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार फॉरेन्सिक अहवालातून समोर आला आहे. ३३ वर्षीय प्राजक्ता मेहेर यांचा ९ एप्रिल २०२६ रोजी मृत्यू झाला होता आणि सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली होती. मात्र, माहेरच्या नातेवाईकांनी हत्येचा संशय व्यक्त केल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरील नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले होते. या अहवालात प्राजक्ता यांचे नाक आणि तोंड दाबून गुदमरवून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या अहवालाच्या आधारे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्राजक्ता यांचे पती योगेश मेहेर आणि सासू अरुणा मेहेर यांना पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून, पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या दोन महिन्यांत हे गूढ उकलण्यास मदत झाली आहे. या प्रकरणातील तपासाबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी सांगितले की, वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, गुन्ह्यात सहभागी असलेल्या कोणालाही अभय दिले जाणार नाही.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in