Badlapur: बर्थडे पार्टीत मैत्रिणीनेच पाजलं गुंगीचं औषध, तरुणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक

Badlapur: बर्थडे पार्टीत मैत्रिणीनेच पाजलं गुंगीचं औषध, तरुणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक

बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी शिरगाव येथे राहणाऱ्या एका तरुणीसोबत ओळख झाली होती. दोन दिवसापूर्वी त्या मैत्रिणीने...
Published on

बदलापूर : आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचित दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात समोर आली आहे. याप्रकरणी दोन तरुणांसह पीडित तरुणीला गुंगीचे औषध देणाऱ्या मैत्रिणीलाही अटक करण्यात आली आहे.

बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी शिरगाव येथे राहणाऱ्या एका तरुणीसोबत ओळख झाली होती. दोन दिवसापूर्वी त्या मैत्रिणीने तिच्या वाढदिवसासाठी पीडित तरुणीला तसेच तिच्या दोन मित्रांना तिच्या घरी पार्टीसाठी बोलावले होते. रात्रभर पार्टी केल्यानंतर संबंधित मुलीने पीडित तरुणीला

पेयातून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीवर इतर दोन मित्रांनी सामूहिक अत्याचार केला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्याने पीडित तरुणीच्या पालकांनी संबंधित मुलीशी संपर्क केला असता तुमची मुलगी मद्य प्राशन करून येथे पडल्याचे त्या मुलीने सांगितले.

पालकांसोबत घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानुसार तिने याबाबत पालक आणि पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली असता तरुणीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न होताच, पीडित तरुणीला गुंगीचे औषध देणाऱ्या मैत्रीण व सातारा येथून आलेले दोन तरुण अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तिघांनाही अटक केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण वालवडकर यांनी दिली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in