Badlapur : कामाला जायची घाई जीवावर! बदलापूरमध्ये लोकल पकडताना विवाहितेचा मृत्यू

लोकल पकडताना झालेल्या अपघातात बदलापुरात चेतना चंद्रशेखर देवरुखकर (२८) या नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Badlapur : कामाला जायची घाई जीवावर! बदलापूरमध्ये लोकल पकडताना विवाहितेचा मृत्यू
Published on

बदलापूर : लोकल पकडताना झालेल्या अपघातात बदलापुरात चेतना चंद्रशेखर देवरुखकर (२८) या नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे चेतना देवरुखकर या बदलापूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून सकाळी ८.१० ची लोकल पकडण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्यावेळी लोकल सुटल्याने त्यांनी धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. प्लॅटफॉर्म तीनवर मुंबईच्या दिशेला प्लॅटफॉर्म संपतो त्यापासून काही अंतरावरच लोकल उभी असते. त्यामुळे पहिला लेडीज डबा पकडताना चेतना यांचा तोल जाऊन त्या थेट रुळावर कोसळल्या आणि लोकलचा जोरदार धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

चेतना देवरुखकर या बदलापूर पूर्वेतील ज्युवेली गाव परिसरातील ‘जगन्नाथ गॅलेक्सी’ या सोसायटीत वास्तव्यास होत्या. वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्या ठाण्यातील एका कंपनीत नोकरीला होत्या. त्यानिमित्ताने त्या दररोज बदलापूर ते ठाणे असा लोकल प्रवास करीत होत्या. मात्र, धावती लोकल पकडण्याच्या घाईमुळे शनिवारचा त्यांचा लोकल प्रवास अखेरचा प्रवास ठरला.

logo
marathi.freepressjournal.in