अतिशय निंदनीय व मन हेलावून टाकणारी घटना -फडणवीस

Badlapur Minors Sexual Abuse Case: राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली आहे.
अतिशय निंदनीय व मन हेलावून टाकणारी घटना -फडणवीस
Published on

नवी दिल्ली : राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली आहे. बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शाळेतल्या दोन अतिशय लहान मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केला. ही अत्यंत निंदणीय व मन हेलावून टाकणारी घटना आहे. या घटनेचा उद्रेक बदलापुरात दिसून आला आहे. मुख्यमंत्र्यांनीही या घटनेची दखल घेतली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांना या घटनेचे राजकारण न करण्याचेही आवाहन केले. विशेषतः त्यांनी या प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

सरकारने या प्रकरणी तत्काळ वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वात चौकशी समिती स्थापन केली आहे. एखाद्या महिला अधिकाऱ्यानेच या प्रकरणाची चौकशी करावी, अशी सरकारची यामागील भावना आहे. पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत जी काही तातडीची कारवाई करण्याची गरज आहे, ती केली जात आहे. आरोपीवर तत्काळ आरोपपत्र दाखल केले जाईल. फास्ट ट्रॅक कोर्ट नियुक्त करण्याचा प्रस्तावही मागवण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा नराधमांना तत्काळ शिक्षा होईल, असा राज्य सरकार व पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार आवश्यक असणारी सर्वच कारवाई करण्याची सुरुवात अत्यंत वेगाने करण्यात आली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in