Badlapur : इंस्टाग्राम अकाऊंटच्या मदतीने फरार आरोपीची धरपकड

फरार आरोपी गाडी टाकून पळाला. मात्र पोलिसांनी त्याच्या इंस्टाग्राम आणि इमेल आयडीची माहिती मिळवली. आणि मुंबईत लपून बसलेल्या फरार आरोपीची त्याच्या साथीदारांसह धरपकड केली.
Badlapur : इंस्टाग्राम अकाऊंटच्या मदतीने फरार आरोपीची धरपकड
Badlapur : इंस्टाग्राम अकाऊंटच्या मदतीने फरार आरोपीची धरपकड 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

बदलापूर : फरार आरोपी गाडी टाकून पळाला. मात्र पोलिसांनी त्याच्या इंस्टाग्राम आणि इमेल आयडीची माहिती मिळवली. आणि मुंबईत लपून बसलेल्या फरार आरोपीची त्याच्या साथीदारांसह धरपकड केली. पोलिसांनी त्यांच्याकडून ३ अवैध अग्निशस्त्र, ८ जिवंत काडतुस, १ गाडी आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी जिल्ह्यातील फरारी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काम करत असताना, दाखल गुन्ह्यातील आरोपी दिग्विजय ऊर्फ डिग्या पिसाळ हा साई वालीवली, अंबरनाथ परिसरात असल्याची माहिती पोलीस शिपाई नरेंद्र कोळी यांना मिळाली होती. त्यानुसार कुळगाव पोलिसांनी साई वालीवली परिसरात शोधमोहीम राबवली. तो गाडीतून पळून जात असल्याचे पाहून पोलिसांनी त्याच्या गाडीचा पाठलाग केला.

मात्र जांभूळ गावाच्या जंगलातील मोकळ्या जागेत गाडी टाकून तो तीन साथीदारांसह पळून पळून जात होता. त्यावेळी त्यापैकी एक विधीसंघर्षग्रस्त बालक पोलीसांनी पाठलाग करुन पकडले. त्याच्याकडून पळून जाणाऱ्या इसमाची नावे समजल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या थार गाडीची झडती घेतली.गाडीमध्ये दोन गावड्डी कट्टे तसेच ७ जिवंत काडतुस मिळून आल्याने कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

करुन एक विधीसंघर्षग्रस्त बालकासह तिघांना अटक करण्यात आली. मात्र दिग्विजय ऊर्फ डिम्या पिसाळ हा फरारी होता. कुळगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे दहिसर, मुंबई येथून त्यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान दिग्विजय अमर पिसाळ याच्याकडून आणखी एक गावठी कट्टा जप्त केला. या प्रकरणात दिग्विजय ऊर्फ डिग्या पिसाळ सहित ६ जणांना अटक केली आहे.

पोलिसांकडून स्मार्ट तपास

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे स्मार्ट पद्धतीने तपास सुरू केला. सायबर तज्ञांच्या मदतीने दिग्याच्या इंस्टाग्राम आयडीचे तांत्रिक विश्लेषण करून त्याचा मेल आयडी शोधण्यात आला. त्याचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर तो मेल आयडी कळंबोली येथील एका इसमाचा असल्याचे निष्पन्न झाले.त्याला ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता दिग्विजय पिसाळ आणि त्याचे साथीदार मुंबईतील बोरिवली परिसरात एका साथीदाराच्या घरी असल्याचे निष्पन्न झाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in