'हॉट सॅटर्डे' इन बदलापूर! १३ वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद; पारा ४२.९ अंशांवर

गेल्या काही दिवसांपासून बदलापूरमध्ये तापमानात मोठी वाढ होत असून पारा चाळीशीपार करत आहे.
'हॉट सॅटर्डे' इन बदलापूर! १३ वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद; पारा ४२.९ अंशांवर
'हॉट सॅटर्डे' इन बदलापूर! १३ वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद; पारा ४२.९ अंशांवर
Published on

बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून बदलापूरमध्ये तापमानात मोठी वाढ होत असून पारा चाळीशीपार करत आहे. शनिवारी (दि. ९) बदलापुरात तब्बल ४२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, गेल्या १३ वर्षांतील मे महिन्यातील हे सर्वाधिक तापमान असल्याची माहिती समोर आली आहे.

बदलापूरचे खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मे महिन्यात कोकण पट्ट्यात गेल्या १३ वर्षातील सर्वाधिक तापमान अनुभवास येत आहे. बदलापुरातही यंदा विक्रमी उष्णतेची नोंद होत आहे.

अभिजीत मोडक हे गेल्या १३ वर्षांपासून बदलापूरच्या हवामानाचा अभ्यास करत आहेत. त्यांच्या नोंदीनुसार, यापूर्वी २० मे २०१९ रोजी ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, जी आतापर्यंतची सर्वाधिक होती. मात्र, ९ मे २०२६ रोजी नोंदवलेले ४२.९ अंश सेल्सिअस तापमान हा विक्रम मोडणारे ठरले आहे.

हे तापमान सरासरीपेक्षा सुमारे ६ अंश सेल्सिअस अधिक असल्याने हवेत प्रचंड उष्मा जाणवत असून, त्यामुळे ९ मेचा शनिवार हा गेल्या १३ वर्षातील मे महिन्यातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. त्यांनी पुढील अंदाज व्यक्त करत आणखी दोन दिवस तापमान असेच उच्च राहण्याची शक्यता असून त्यानंतर हळूहळू तापमानात घट होऊन पारा ४० अंशांच्या खाली येईल.

अभिजीत मोडक, खासगी हवामान अभ्यासक बदलापूर

अवकाळी पावसाची हजेरी

शनिवारी सकाळपासून बदलापुरात प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र दुपारनंतर अचानक वातावरण ढगाळ झाले आणि संध्याकाळी सुमारे पावणेपाचच्या दरम्यान अवकाळी पावसाच्या किरकोळ सरी बरसल्या. त्यामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र पाऊस थांबताच पुन्हा उकाडा जाणवू लागल्याने हा दिलासा अल्पकाळच टिकला.

logo
marathi.freepressjournal.in