

बदलापूर : शहरात तीस वर्षीय तरुणाची पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
बदलापूर पश्चिमेतील रमेशवाडी भागात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर रात्री हा प्रकार घडला. या हल्ल्यात गणेश यादव (३०) याचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र अबू हलाल शेख गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणात अवनीश सिंग आणि संदीप सिंग या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश यादव आणि हल्लेखोरांमध्ये २०२२-२३ या काळात वाद झाले होते. त्यावेळीही त्यांच्यात हाणामारी झाली होती आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित तरुण जामिनावर बाहेर होते.