बहुजन विकास आघाडीचे कांचन ठाकूर यांचा भाजपात प्रवेश

बहुजन विकास आघाडीचे कांचन ठाकूर यांचा भाजपात प्रवेश

बहुजन विकास आघाडीचे कांचन ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला अाहे. यावेळी युवकांच्या संघटनांसोबत प्रश्नावर लढण्याची आवश्यकता असल्याचे मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टी ही विचारांची पार्टी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर आनंदी होऊन अनेकजण पक्षात प्रवेश करत आहेत, कांचन ठाकूर यांनीही भाजपच्या विचारांवर विश्वास ठेवला, ही आनंदाची गोष्ट असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. हा पक्ष प्रवेश कार्यक्रम मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडला. भारतीय जनता पार्टीचा अंत्योदय कल्याणाचा विचार सामान्य व्यक्तींना आपला वाटतो आहे, देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारे मोदीजी आणि राज्याला विकासाचे स्वप्न दाखवणारे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येऊ शकते. युवा पिढीने भाजपच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन आमदार प्रसाद लाड यांनी केले. युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यभरात चांगले संघटन उभे राहिले आहे. येणाऱ्या काळातही युवा मोर्चा अधिक आक्रमकपणे आपल्या भूमिका मांडेल असे सांगतानाच भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी कांचन यांची प्रदेश सचिव पदी निवड केल्याचे जाहीर केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in