ठाण्यात भावी मुख्यमंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांचे बॅनर्स

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकले आहेत.
ठाण्यात भावी मुख्यमंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांचे बॅनर्स
Published on

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकले आहेत. आव्हाड यांचा ५ ऑगस्ट रोजी वाढदिवस असून त्यापूर्वीच हे बॅनर्स मुलुंड टोलनाका परिसरात जितेंद्र आव्हाड यांच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आहेत. या बॅनरमुळे मात्र पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत.

राज्यात शिवसेना भाजपचे सरकार असून यापूर्वी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री बॅनर्स लावण्यात आले होते. अजित पवार यांच्यासोबतच पंकजा मुंडे, जयंत पाटील, रोहित पवार, नाना पटोले यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा-मुंब्रा विधानसभेचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ५ ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याच्या निमित्ताने त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बॅनरबाजी केली आहे.

मुलुंड टोल नाका या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये जितेंद्र आव्हाड यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आला असल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in