मीरारोडमध्ये बारवाल्यांची ग्राहकाला मारहाण

नरेंद्र उपाध्याय यांना मॅडोना ऑर्केस्ट्रा बार सिल्व्हर पार्क मीरारोड येथे नेले. ऑर्केस्ट्रा बारमधील एका रूममध्ये डांबून ठेवले.
मीरारोडमध्ये बारवाल्यांची ग्राहकाला मारहाण

भाईंंदर : मीरारोडमधील सिल्व्हर पार्क नाक्यावरील मॅडोना बारमधील एका ग्राहकाचे पैसे बाकी असल्याने त्याला घरातून उचलून त्याचे जबरदस्तीने अपहरण करून त्याला बांबू व लाथाबुक्क्या आणि बेल्टने बेदम मारहाण केल्याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तर तक्रारदार यांनी पोलीस बारचालक व मालक यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा एकदा डान्स बारवाल्यांनी डोकेवर काढल्याची चर्चा आहे, तर सदरील ऑर्केस्ट्रा बार हा सदनिकेचे रूपांतर करून बनविण्यात आल्याची खुद्द तक्रार सोसायटीने यापूर्वीच पालिका व पोलिसांकडे केलेली असतानाही त्यावर आजपर्यंत कारवाई न करता त्यांना आजवर पाठीशी घालण्याचे काम प्रशासनाने केले आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मॅडोना ऑर्केस्ट्रा कम डान्स बारमध्ये एका ग्राहकाचे नरेंद्र उपाध्याय या ग्राहकाचे ५९ हजार रुपये उधारीच्यापैशावरून मॅडोना बारमधील बार मधील कर्मचारी वाहीद, गणेश पाटील, कमलेश, मोसीन व त्यांच्यासोबत इतर ५ ते ६ अनोळखी व्यक्तींनी बिल्डिंग क्रं. ११ मधील फ्लॅट क्रं.१०४, एव्हरशाईन बिल्डिंग, मीरारोड पूर्व येथून बाहेर येण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे घराच्या बाहेर आले असता त्यांनी उपाध्याय यांना बिल्डिंगच्या गेट बाहेर नेऊन मारहाण सुरुवात केली व बळजबरीने एका रिक्षात बसवून अपहरण केले.

त्यानंतर नरेंद्र उपाध्याय यांना मॅडोना ऑर्केस्ट्रा बार सिल्व्हर पार्क मीरारोड येथे नेले. ऑर्केस्ट्रा बारमधील एका रूममध्ये डांबून ठेवले. त्यानंतर आरोपी वाहीद, गणेश पाटील, कमलेश, मोसीन यांनी कमरेचे बेल्ड काढून उपाध्याय यांच्या पाठीवर पायावर व पोटावर मारहाण केली तेव्हा इतर ५ ते ६ अनोळखी आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जबर दुखापत केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in