उल्हासनगरातील गणेश घाटांचे सुशोभीकरण करा; आयुक्तांकडे मागणी

गणेश घाटात दीड दिवस ते अनंत चतुर्थी पर्यंतच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येते.
उल्हासनगरातील गणेश घाटांचे सुशोभीकरण करा; आयुक्तांकडे मागणी

गणेशोत्सव तोंडावर आला असून तत्पूर्वी दुरावस्था झालेल्या उल्हासनगरातील गणेश घाटांचे सुशोभीकरण करून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांनी पालिका आयुक्त अजीज शेख यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देताना शिंदे गटाचे जेष्ठ नेते गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर महाराज, जेष्ठ शिवसैनिक नाना बागूल, जयकुमार केणी, प्रमोद पांडे, मनोहर बेहनवाल आदी उपस्थित होते.

शहरात ५ गणेशघाट असून त्यांची दुरवस्था झालेली आहे. गणेश घाटात दीड दिवस ते अनंत चतुर्थी पर्यंतच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. मात्र गणेश घाटांची दुरवस्था झालेली असून चिखलामुळे मूर्ती विसर्जन करतांना घटना घडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व गणेश घाटांची स्वच्छता करून सुशोभीकरण करण्यात यावे आणि रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी भुल्लर महाराज यांनी निवेदनात केली आहे. त्यावर आयुक्त अजीज शेख यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती गोपाळ लांडगे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in