बेलवली सबवे लवकरच पूर्ण करण्यात येणार

मे अखेरीस बेलवली सबवेतील रस्त्याच्या वॉटरप्रुफिंग व काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात केली होती.
बेलवली सबवे लवकरच पूर्ण करण्यात येणार

बेलवली सबवेमध्ये रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या छोट्या गटारावर लोखंडी जाळ्या बसविण्याचे आश्वासन नगर अभियंत्यांनी दिले होते. त्यानुसार हे काम करण्यातही आले. मात्र त्यानंतरही एका बाजूला एक दीड फूट लोखंडी जाळी बसविण्याचे राहून गेले होते. हे कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे नगर अभियंता संजय कुंभार यांनी स्पष्ट केले आहे.

कुळगाव बदलापूर नगर परिषदेने मे अखेरीस बेलवली सबवेतील रस्त्याच्या वॉटरप्रुफिंग व काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात केली होती.या कामांसाठी हा रस्ता २० दिवस बंद ठेवण्यात आला होता. दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबून वाहतुकीला बंद राहणाऱ्या या सबवेमध्ये हे काम झाल्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात पाणी तुंबले नाही. याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. मात्र सबवेच्या रस्त्याला दोन्ही बाजूला असलेल्या छोट्या गटारावर असलेली जाळी काही ठिकाणी अर्धवट राहिल्याने अपघातांची शक्यता असल्याची भीती नागरिक व्यक्त करीत होते. याबाबत नगर अभियंता संजय कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता सबवेच्या रस्त्याची पाहणी करून अर्धवट राहिलेल्या जाळ्या बसविल्या जातील,असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार या जाळ्या बसविण्याचे कामही करण्यात आले. मात्र या जाळ्या बसविताना एका बाजूला सुमारे एक ते दीड फूट जाळी बसविण्याचे राहून गेले आहे. नगर परिषद प्रशासनाने तातडीने याठिकाणी जाळी बसवून सबवेवरील वाहतूक पूर्ण सुरक्षित करावी,अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in