वसई-विरारमधील वाळू माफियाविरोधात भरारी पथकाची कारवाई; ४ बोटी नष्ट

वसई-विरारमधील वाळू माफियाविरोधात भरारी पथकाची कारवाई; ४ बोटी नष्ट

वसई-विरार बहुतांश भाग हा किनारपट्टीचा परिसर आहे. विरारजवळील भागात वैतरणा व शिरगाव, नारिंगी खाड्यामध्ये छुप्या मार्गाने सक्शन पंप लावून वाळू उपसा होत असतो. या भागत वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. मंगळवारी खनिकर्म अधिकारी व मंडळ अधिकारी काशिदकोपर, तलाठी भरारी पथकाने छापा घातला.

वसई : वसई- विरारच्या किनारपट्टीवर पुन्हा वाळू माफिया सक्रिय झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मंगळवारी जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि भरारी पथकाने संयुक्त कारवाई करून विरारजवळील काशीद कोपर येथे अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या एकूण ४ बोटी जप्त केल्या. नंतर या बोटी आणि सक्शन पंप जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. वसई महसूल आणि विरार पोलीस विभाग यांच्या संगनमताने वाळू माफिया मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी करीत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

वसई-विरार बहुतांश भाग हा किनारपट्टीचा परिसर आहे. विरारजवळील भागात वैतरणा व शिरगाव, नारिंगी खाड्यामध्ये छुप्या मार्गाने सक्शन पंप लावून वाळू उपसा होत असतो. या भागत वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. मंगळवारी खनिकर्म अधिकारी व मंडळ अधिकारी काशिदकोपर, तलाठी भरारी पथकाने छापा घातला. कारवाईची खबर लागताच वाळू माफिया फरार झाले. मात्र पथकाने अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या ४ बोटी जप्त केल्या. या ४ बोटी आणि वाळू उत्खनन करण्यासाठी वापरला जाणारा सक्शन पंप जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट करून नष्ट करण्यात आल्या. भरारी पथकातील जिल्हा खनिकर्म अधिकारी संदीप पाटील, अधिकार शुल्क निरीक्षक मारोती सुर्यवंशी मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे विजयकुमार मींड, विलास पाटील, अनिकेत काळेल आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

वसई महसूल आणि विरार पोलीस विभाग यांच्या संगनमताने वाळू माफिया मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी करीत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. यात लाखो रुपयांचा व्यवहार होत असून, वाळू तस्करांना संरक्षण देण्यात येत असल्याची चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in