उल्हासनगरमध्ये भरारी पथकाची कारवाई; उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी केला कारवाईबाबत खुलासा

उल्हासनगरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्यातील एका भरारी पथक प्रमुख अजित घोरपडे, सचिन वानखेडे व पोलीस किशोर वंजारी यांनी दोन दिवसांपूर्वी रात्री सेंच्युरी कंपनीजवळ सीएमएस बँकेची गाडी अडवली.
उल्हासनगरमध्ये भरारी पथकाची कारवाई; उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी केला कारवाईबाबत खुलासा

उल्हासनगर : निवडणुकीच्या कालावधीत कॅशवर व इतर बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने कॅशच्या क्यूआर कोडची तफावत असलेल्या एका बँकेची गाडी ताब्यात घेतली आहे. या गाडीत १ कोटी ८ लाख रुपयांच्या वर कॅश मिळून आली असून, याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी कॅश सीजर रिलीज कमिटीला रिपोर्ट सादर केलेला आहे.

उल्हासनगरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्यातील एका भरारी पथक प्रमुख अजित घोरपडे, सचिन वानखेडे व पोलीस किशोर वंजारी यांनी दोन दिवसांपूर्वी रात्री सेंच्युरी कंपनीजवळ सीएमएस बँकेची गाडी अडवली. गाडीत मोठ्या प्रमाणावर कॅश असल्याने पथकाने क्यूआर कोडची मागणी केली; मात्र त्यांच्याकडून खात्रीशीर उत्तर मिळाले नसल्याने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या आदेशानुसार ती गाडी ताब्यात घेऊन उल्हासनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आली.

त्यानंतर इन्कम टॅक्सला बोलविण्यात आले. गाडीतील कर्मचाऱ्यांकडे काही रुपयांच्या कॅशचा क्यूआर कोड होता. मात्र सकाळपर्यंत मोजणी करण्यात आली असता गाडीत १ कोटी ८ लाखांच्या वर कॅश मिळून आली. इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी सर्व गोष्टी पडताळून ताब्यात घेतलेली कॅश जप्त करण्याची गरज नसल्याचा रिपोर्ट दिलेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in