भाईंंदर : पालिकेला उशिरा सुचलेले शहाणपण; खून झाल्यानंतर फेरीवाल्यांवर कारवाई, रस्ते व रेल्वे स्टेशनवर फेरीवाल्यांचा कब्जा

मीरा-भाईंदर महानगरपालिकेने बेकायदेशीर फेरीवाल्यांना खतपाणी घालत त्यांच्याकडून राजकीय नेत्यांना व फेरीवाल्यांना हाताशी धरून हप्ते वसुली करून त्यांना थेट रेल्वे स्थानक परिसर, स्काय वॉक, पदपथ व रस्त्यांवर अतिक्रमणे करून देत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत करोडो रुपयांची आर्थिक वसुली सुरू आहे.
भाईंंदर : पालिकेला उशिरा सुचलेले शहाणपण; खून झाल्यानंतर फेरीवाल्यांवर कारवाई, रस्ते व रेल्वे स्टेशनवर फेरीवाल्यांचा कब्जा
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

भाईंंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेने बेकायदेशीर फेरीवाल्यांना खतपाणी घालत त्यांच्याकडून राजकीय नेत्यांना व फेरीवाल्यांना हाताशी धरून हप्ते वसुली करून त्यांना थेट रेल्वे स्थानक परिसर, स्काय वॉक, पदपथ व रस्त्यांवर अतिक्रमणे करून देत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत करोडो रुपयांची आर्थिक वसुली सुरू आहे. त्याच फेरीवाल्यांच्या जागेच्या वादातून एकाची नया नगरमध्ये गोळी झाडून हत्या केल्यानंतर पालिकेला उशिरा शहाणपण सूचत काही हातगाड्यांवर कारवाई करत खून झाल्यानंतर 'वरातीमागून घोडे चालवत' अशा पद्धतीने कारवाई केली आहे. तर पालिकेच्या प्रभाग अधिकारी व फेरीवाला पथक प्रमुख कर्मचारी यांच्या माध्यमातून मुख्य नाक्यावर व रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या तीन बाय चार फुटाच्या जागा या चार लाख व पाच लाख आणि गल्ली बोळात दीड - दोन, तीन लाखांना विकून फेरीवाले बसविले जातात.

मीरा-भाईंदर शहरात राहणारे लोकांपेक्षा जास्त नालासोपारा, वसई, विरार, दहिसर व बोरिवली भागातून दररोज येऊन व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या जास्त आहे. यात स्थानिक फेरीवाले व बाहेरील फेरीवाले हे महिना मोक्याच्या जागांना २० हजार भाडे आणि गल्लीबोळात १० -१२ हजार भाडे, हप्ता वसूल केला जातो. त्यात पालिका उपायुक्त अतिक्रमण, अतिक्रमण विभाग प्रमुख, प्रभाग अधिकारी व अतिक्रमण इंजिनियर आणि फेरीवाला पथक प्रमुख यांचा हिस्सा ठरलेला असतो असे आहे.

बेकायदा फेरीवाले यांचा विभाग वाईज एक ठरलेला खासगी हप्ता वसुली करून पालिकेनी जर माल पकडून नेला तर तो सोडवून देणारा असतो. त्याच पद्धतीने नया नगरमध्ये सहा ते साडेसहा हजार फेरीवाल्यांचा एक प्रमुख असतो त्यात तो कारवाई अगोदर सूचना देऊन फेरीवाल्यांना पळवून लावतो, त्यात तो युसूफ नावाचा एक वयस्कर असून तो तिथला प्रमुख आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर ६ जानेवारी रोजी मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक ५ अंतर्गत मीरारोड स्टेशन परिसरात गाळ्यासमोरील अनधिकृत छपरे, हातगाड्या, अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्या कारवाई दरम्यान ६२ हातगाड्या, अनधिकृतपणे बनवण्यात आलेल्या ६ गाळ्याच्या समोरील छपऱ्यावर, एक पानटपरी व एक गाला यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने महापालिका अतिक्रमण विभागामार्फत तोडक कारवाई करण्यात आली आहे.

फेरीवाल्यांचा शहराला विळखा

मीरा- भाईंदर शहरात असणाऱ्या नागरिकांची गरज म्हणून पालिकेने काही ठिकाणी भाजीमंडई सुरू केल्या आहेत. मात्र तरी देखील रस्त्यावर जागा अडवून काही जण अनधिकृतरित्या भाजी किंवा नाश्ताचे धंदे रस्त्यावर किंवा फुटपाथवर जागा व्यापून करतात. या व्यवसायामुळे मिळणाऱ्या उत्पनातून अनेक जणांची घरे चालत आहेत. पण मोठ्या प्रमाणात शहरातील रस्त्यावर, फुटपाथवर फेरीवाल्यांनी घुसखोरी केली असून सदर बाजार पूर्ण शहरातील गल्लोगल्लीत विस्तारला आहे. फेरीवाले थेट रस्ता- पदपथावर बस्तान मांडून बसले आहेत. एका मागोमाग एक अशा हातगाड्या लावल्या जात आहेत. रस्ते - पदपथावरील जागांवर फेरीवाल्यांकडून मालकीहक्कच सांगितला जात आहे.

कारवाई होणे गरजेचे !

भाईंदर पूर्वेच्या राहुल पार्क, नवघर रोड, बी.पी.रोड, इंद्रलोक नाका, भाईंदर पश्चिमेच्या ९० फुटी रोड, ६० फुटी रोड, भाईंदर स्टेशन रोड, शिवसेना गल्ली जवळ, जैन मंदिर, मीरारोडमधील शांती नगर, शांती पार्क, आर.एन.ए. ब्रॉडवे समोर, विजय पार्क, सिल्वर पार्क, पूनम सागर, रामदेव पार्क, कनकिया, हाटकेश परिसर, मीरारोड स्टेशन व नया नगर, काशिमीरा नाका, राष्ट्रीय महामार्ग, भाईंदर रेल्वे स्थानक परिसर, उत्तन नाका आदी भागात देखील कारवाई होणे गरजेचे आहे.भाईंदर पूर्वेच्या राहुल पार्क, नवघर रोड, बी.पी.रोड, इंद्रलोक नाका, भाईंदर पश्चिमेच्या ९० फुटी रोड, ६० फुटी रोड, भाईंदर स्टेशन रोड, शिवसेना गल्ली जवळ, जैन मंदिर, मीरारोडमधील शांती नगर, शांती पार्क, आर.एन.ए. ब्रॉडवे समोर, विजय पार्क, सिल्वर पार्क, पूनम सागर, रामदेव पार्क, कनकिया, हाटकेश परिसर, मीरारोड स्टेशन व नया नगर, काशिमीरा नाका, राष्ट्रीय महामार्ग, भाईंदर रेल्वे स्थानक परिसर, उत्तन नाका आदी भागात देखील कारवाई होणे गरजेचे आहे.

logo
marathi.freepressjournal.in