भाईंदरमध्ये शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

भाईंदर मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ह्यात खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षणाने तिथे शिकवणी घेणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. याप्रकरणी बलात्कार सह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आली आहे.
भाईंदरमध्ये शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Published on

भाईंदर : भाईंदर मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ह्यात खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाने तिथे शिकवणी घेणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. याप्रकरणी बलात्कार सह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सदर नराधम आरोपी हा भाईंदर मधील प्रसिद्ध क्लासेसचा शिक्षक असून त्याचे वय वर्ष ५० आहे. सदर नराधम आरोपीने १७ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले आहे. हा नराधम शिक्षक ऑक्टोबर २०२४ ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत सलग या मुलीवर अत्याचार करत होता. तिच्या आई-वडिलांसह तिला जिवेठार मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करत होता. अखेर नवघर पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकत अटक केली आहे.

१७ वर्षीय पीडिता हि एफवाय.बीए मध्ये शिक्षण घेत आहे. खासगी शिकवणीसाठी तिने या क्लासमध्ये प्रवेश घेतला होता.

logo
marathi.freepressjournal.in