Bhiwandi : लग्न समारंभासाठी जात असताना दोन सख्ख्या भावांचा अपघाती मृत्यू, कुटुंबावर शोककळा

'करे कोई और भरे कोई और' या हिंदी उक्तीप्रमाणे भिवंडीतील दोन सख्खे भाऊ नातेवाईकाच्या लग्न कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना...
Bhiwandi : लग्न समारंभासाठी जात असताना दोन सख्ख्या भावांचा अपघाती मृत्यू, कुटुंबावर शोककळा

भिवंडी : 'करे कोई और भरे कोई और' या हिंदी उक्तीप्रमाणे भिवंडीतील दोन सख्खे भाऊ नातेवाईकाच्या लग्न कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना त्यांना भरधाव कारने जोरदार धडक दिली असता त्यात दोघा भावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पंढरीनाथ पाटील व गुरुनाथ पाटील अशी अपघातात दुर्दैवी मयत झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. या दुर्दैवी अपघाती निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून, दोघा भावांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. या अपघातप्रकरणी कारचालकाविरुद्ध गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भिवंडी-वाडा रस्त्यावर भिवंडीहून अंबाडीकडे जाणाऱ्या वॅगनार कारवरील चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवून प्रथम दुगाड फाटा येथे एका महिलेला जोरात धडक दिली. त्या भीतीपोटी पसार होण्यासाठी चालकाने कार आणखी वेगात पळवण्याच्या तंदरीत भिवंडीहून दुचाकीवरून दिघाशी येथील नातेवाईकाकडे लग्नसमारंभासाठी निघालेल्या दोघा भावांच्या दुचाकीला वारेट या ठिकाणी जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चालक जखमी झाला आहे. कारचालकावर भिवंडीतील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद गणेशपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in