भिवंडी : लग्नास नकार देणाऱ्या शिक्षिकेची बदनामी करणाऱ्यास अटक

भिवंडी : लग्नास नकार देणाऱ्या शिक्षिकेची बदनामी करणाऱ्यास अटक

३२ वर्षीय शिक्षिकेचे ३४ वर्षीय तरुणाशी लग्न ठरलेले असतानाच शिक्षिकेस तरुणाच्या चारित्र्यावर संशय आल्याने तिने लग्नास नकार दिला. त्यानंतर तरुणाने...
Published on

भिवंडी : ३२ वर्षीय शिक्षिकेचे ३४ वर्षीय तरुणाशी लग्न ठरलेले असतानाच शिक्षिकेस तरुणाच्या चारित्र्यावर संशय आल्याने तिने लग्नास नकार दिला. त्यानंतर तरुणाने शिक्षिकेसह तिच्या कुटुंबीयांशी वारंवार संपर्क साधून तिच्यासोबत काढलेला फोटो सामाजिक माध्यमांवर व्हायरल करून तिची बदनामी केल्याप्रकरणी सदर तरुणास शहर पोलिसांनी अटक केली आहे.

सदर शिक्षिका ही शहरातील कामतघर परिसरात राहत असून त्याच परिसरातील एका शाळेत मुलांची शिकवणी घेते, तर ३४ वर्षीय तरुण मुंबईतील पश्चिममध्ये राहत आहे. दरम्यान, २८ मे रोजी दोघांचे लग्न करण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु काही कालावधीनंतर शिक्षिकेला तरुणाच्या चारित्र्यावर संशय आल्याने पीडितेने तरुणाला लग्नास नकार दिला. त्याचाच फायदा घेत आरोपीने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पीडित शिक्षिकेच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करीत पीडितेसोबतचा फोटो प्रसिद्ध करत शिक्षिकेची बदनामी केली.

? याप्रकरणी ९ सप्टेंबर रोजी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तरुणास सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वपोनि महादेव कुंभार करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in